शुभ सह्याद्रीवर आपला व्यवसाय नोंदवताना कोणत्या अटी लागू होतील, व्यावसायिकाची कोणती जबाबदारी असेल आणि शुभ सह्याद्रीची भूमिका नेमकी काय असेल, याची स्पष्ट माहिती या करारामध्ये दिली आहे.
शेवटचे अद्यतन : ३१ ऑगस्ट २०२६शुभ सह्याद्री हे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे व्यावसायिक शोधण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मदत करणारे ऑनलाइन व्यासपीठ आहे. येथे छायाचित्रण, चित्रिकरण, सजावट, मंडप, ध्वनिव्यवस्था, मेकअप, मेहंदी, प्रवास व वाहन व्यवस्था तसेच इतर विविध सेवांशी संबंधित व्यावसायिक आपली सेवा आणि व्यवसायाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात. शुभ सह्याद्री स्वतः कोणतीही सेवा देत नसून ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यात संपर्क निर्माण करण्याचे काम करते. ग्राहकांकडून मिळणारी चौकशी ही केवळ संपर्काची संधी असून त्यातून बुकिंग किंवा व्यवसाय मिळण्याची हमी दिली जात नाही. व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची माहिती, सेवा, किंमत, उपलब्धता, छायाचित्रे आणि इतर तपशील अचूक व सत्य ठेवणे आवश्यक आहे. ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यातील किंमत, आगाऊ रक्कम, सेवा, बुकिंग, रद्द करणे, परतावा किंवा इतर कोणताही अंतिम व्यवहार संबंधित दोन्ही पक्षांनी परस्पर ठरवायचा असून त्याची जबाबदारी शुभ सह्याद्रीची राहणार नाही. फसवणूक, चुकीची माहिती, बनावट अभिप्राय, ग्राहकांची दिशाभूल किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास शुभ सह्याद्रीला संबंधित नोंदणी किंवा खाते बंद करण्याचा अधिकार राहील. ग्राहकांची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवणे आणि तिचा योग्य कारणासाठीच वापर करणे आवश्यक आहे. शुभ सह्याद्रीवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ग्राहकांनी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकाची सेवा, किंमत, उपलब्धता आणि इतर आवश्यक तपशील स्वतः तपासावेत. शुभ सह्याद्रीचे हे ऑनलाइन व्यासपीठ भारतातील लागू कायदे व नियमांनुसार कार्य करेल.
शुभ सह्याद्रीवर व्यवसायिक म्हणून नोंदणी करण्यासाठी आपण:
व्यवसायिकाने:
शुभ सह्याद्रीचा वापर करून खालील कृती करणे प्रतिबंधित आहे:
अशा कृती आढळल्यास संबंधित प्रोफाइल हटवणे, खाते निलंबित करणे किंवा कायमचे बंद करणे शक्य आहे.
शुभ सह्याद्रीला खालील परिस्थितीत व्यवसायिकाचे खाते किंवा प्रोफाइल तात्पुरते निलंबित, मर्यादित किंवा कायमचे बंद करण्याचा अधिकार राहील:
शक्य असल्यास कारवाईपूर्वी व्यवसायिकाला स्पष्टीकरण देण्याची संधी दिली जाऊ शकते. मात्र फसवणूक, सुरक्षितता किंवा कायदेशीर कारण असल्यास पूर्वसूचना न देता खाते निलंबित केले जाऊ शकते.
व्यवसायिकाला आपले खाते बंद करायचे असल्यास शुभ सह्याद्रीशी संपर्क करून खाते बंद करण्याची विनंती करता येईल.
खाते बंद केल्यामुळे आधी भरलेले लागू शुल्क आपोआप परत मिळेलच असे नाही.
या कराराबाबत, व्यवसायिक नोंदणीबाबत, शुल्काबाबत, प्रोफाइलबाबत किंवा इतर कोणत्याही प्रश्नासाठी खालील माध्यमातून शुभ सह्याद्रीशी संपर्क साधता येईल.
शुभ सह्याद्री